दडपे पोहे
साहित्य-
पातळ पोहे -३ मूठभर, १ मोठा कांदा -बारीक चिरून, खवलेला ओला नारळ-३ ते ४ टेबल स्पून, लिंबाचा रस -दीड टेबल स्पून, शेंगदाणे-१ टेबल स्पून , २ हिरव्या मिरच्या -बारीक चिरून , साखर-१ टी स्पून, जिरे-मोहोरी -१ टी स्पून, कढीपत्ता -४ ते ५ पाने, गरजेनुसार तेल, चिमुटभर हळद व चवीनुसार मीठ/ शेंदेमीठ किंवा सैन्धव साखर
साखर
साखर
कृती -
१)प्रथम एका बाउलमध्ये पोहे घ्यावेत त्यात बारीक चिरलेला कांदा व खवलेला
ओला नारळ घालून हातानेच मिक्स करावे .आता यांत लिंबाचा रस ,साखर व
चवीनुसार मीठ घालून पुन्हा हातानेच एकजीव करावे .
२)एका छोट्या कढल्यात किंवा वघारीयात तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले
कि त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत व तळलेले शेंगदाणे ह्या पोह्यात टाकावे
.आता त्याच गरम तेलात जिरे-मोहोरी घालून तडतडू द्यावी त्यानंतर कढीपत्ता
,हिरव्या मिरच्या ,हळद घालून थोडा वेळ राहू द्यावे व ही तयार फोडणी
पोह्यात घालावी व पुन्हा हातानेच एकजीव करावे .
३)आता ह्या पोह्याच्या बाउलवर एक घट्ट झाकण ठेवावे म्हणजेच ते दडपून
ठेवावे व ५ ते १० मिनिटात वरून बारीक चिरलेली कोथींबीर घालून दडपे पोहे
सर्व्ह करावे .
@ सौ. कार्तिकी जि. शेळके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा