बुधवार, ४ डिसेंबर, २०१३

सुंदर दिसण्यासाठ सोपे घरगुती उपाय!



 सुंदर दिसण्यासाठ सोपे घरगुती उपाय!
त्वचा ही व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सतेज त्वचा पटकन लोकांचे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी कारणीभूत ठरते. त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी, त्वचेला योग्यरित्या पोषण मिळवून देणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्वजेतील तेजस्वीपणा टिकवूण ठेवण्यासाठी, आरोग्यदायी अन्न सोडू नका. आरोग्य आणि सौंदर्य क्षेत्रातील उपभोक्ता उत्पादन आणि सेवा प्रदान करणाऱ्या एका कंपनीच्या त्वचा विशेषतज्ज्ञांनी त्वचेला कांतिमय बनविण्यासाठी काही अशाच टिप्स दिल्या आहेत

*त्वचेला टवटवीत आणि त्वचेतीली पोषण टिकवून ठेवण्यासाठी त्यात ओलावा टिकवून ठेवणे हा रोजच्या रोज शारीरिक निगेचा भाग झाला पाहिजे. हाता-पायांकडे दुर्लक्ष करू नये.
*तरूण आणि कांतीमय रूपासाठी आठवड्यातून दोन वेळा त्वचे वरील मृत त्वचा काढून टाकणे, फार गरजेचे असते. यासाठी घरच्याघरी मध आणि साखरेच्या दान्यांचे मिश्रण करून, त्याचा लेप बनवून लावला जाऊ शकतो.
*ताजी फळं, नारळाचं पाणी, रुचिरा, बदाम यांनी परिपूर्ण संतुलित आहार घ्या किंवा आरोग्याला पोषणयुक्त पदार्थ घेणे उपयुक्त ठरतं.
*त्वचेतील ओलावा टिकूण राहण्यासाठी, घरच्या घरीही लेप तयार करता येऊ शकतात. पपईचा लगदा करून आणि मध यांचे समप्रमाणात मिश्रण करून, चेहऱ्यावर १५ मिनटं त्या मिश्रणाने मसाज करावा. त्यानंतर तो थंड पाण्याने धुवावा.
*गव्हाचा कोंडा :

गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो.
तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे
*एक चमचा मध, एक चमचा काकडीचा रस, एक चमचा संत्र्याचा रस हे सर्व मिक्स करुन चेहऱ्याला लावणे. १५-२० मिनिट लावणे. याचा क्रिम म्हणून उपयोग होतो.

*जायफळ पाण्यत उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.

*टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डग व वर्तुळे कमी होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा