रविवार, ८ डिसेंबर, २०१३

मेथीचे ठेपले



मेथीचे ठेपले



साहित्य

चिरलेली मेथी- १ वाटी गव्हाचे पीठ- ३ वाट्या  आले लसूण आणि मिर्ची पेस्ट -३ चमचे  धणे पुड-२ चमचे जीरे पुड-३ चमचे हळद-१ चमचा  तिखट- १ चमचा  एक मध्यम लिम्बाचा रस  साखर-१ चमचा मीठ-चवीप्रमाणे  तेल-अर्धी वाटी .
कृति
एक इंच आले, ८-१० लसणीच्या पाकळया आणि ३-४ हिरव्या मिरच्या , मीठ आणि साखर घालून मिक्सरवर वाटुन घ्यावे. चिरलेल्या मेथीला हे वाटण लावावे. त्यात लिम्बाचा रस घालावा.त्याला थोड़े पाणी सुटेल. मग त्यात धने पूड जीरेपूड घालावी. गव्हाचे पीठ घालावे तेल घालावे.सगळे नीट मळून घ्यावे। हातात पीठ दाबल्यावर त्याचा मुटका झाला पाहिजे. नाहीतर थोड़े तेल अजुन घालावे. मग थोड़े थोड़े लागेल तसे पाणी घालून मळून गोळा करावा.
त्याचे छोटे छोटे गोळे करून तान्दळाच्या पिठिवर पोळी लाटावी.तव्यावर चपातीप्रमाणे शेकून घ्यावी.शेकताना कडेने थोड़े तेल सोडावे तवा गरम करा आणि ठेपले दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्या. आवडत असेल तर भाजताना किंचित बटर किंवा तूप लावा.

                                                                                                                  @  सौ. कार्तिकी जे. शेळके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा